मुंबई : मराठमोळ्या सई ताम्हणकरची गाडी सध्या सुसाट सुटली आहे. बॉलिवूडमध्ये धूमाकूळ घातल्यानंतर सई आता डायरेक्ट इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.


कोण आहे या चित्रपटात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्लमडॉग मिलेनियर फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डॅनो, मनोज वाजपेयी, आदिल हुसैन, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा आदी कलाकारांसोबत सई ताम्हणकर 'लव्ह सोनिया' या सिनेमात दिसणार आहे.


गुप्तता पाळली आहे....


स्लमडॉग मिलेनियर सिनेमाचे निर्माते तब्रेज नुरानी हे या सिनेमाव्दारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.....सईच्या रोलबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली असून सिनेमात सईचा बोल्ड अंदाज दिसणार हे मात्र नक्की