मुंबई : सैराट सिनेमा, त्यातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार आणि प्रेक्षकांसाठी आजचा फ्रेन्डशीप दिवस सर्वात महत्वाचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण सैराटने आज बॉक्स ऑफिस १०० दिवस पूर्ण केले आहेत, सैराटला पडद्यावरून येऊन आज १०० दिवस पूर्ण झाल्यानं, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे, तसेच नागराजने सर्व प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.


संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटाला अतिशय सुंदर संगीत दिल्याने, प्रेक्षकांना बॉलीवूडपेक्षाही जास्त भावणारं संगीत मराठीत अनुभवायला मिळालं.


सैराटला आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. सैराटची शंभरी निश्चितच प्रेक्षकांना आनंद देणारी आहे.