मुंबई : झी स्टुडिओजची निर्मिती असलेला, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग मिळालं आहे. सैराटने पहिल्या तीन दिवसांत सुमारे 12 कोटी 10 लाखची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रभर जवळ जवळ 400 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये 9000 शोजसह हा सिनेमा सध्या प्रेक्षकांची वाहवा मिळवतो आहे. वीकेडंला सैराटचे जवळपास 90 टक्के शो हाऊसफुल होते. 


ओपनिंगच्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 3.55 कोटींची बक्कळ कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी 3.70 आणि तिसऱ्या दिवशी रविवारी सैराटने 4.85 कोटींची कमाई केली. तिनही दिवस मिळून या चित्रपटाने 12.10 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. 


याआधी टाईमपास २, लयभारी आणि नटसम्राट या तिनही सिनेमांनी दहा कोटींचा आकडा पार केला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर तुफान चालणाऱ्या सैराटने यांचाही विक्रम मोडीत काढला. लोकांचा चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता मल्टिप्लेक्समध्ये शोजची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच प्रेक्षकांच्या आग्रहीखातर दोनवेळा झिंगाट हे गाणं लावलं जातंय.