मुंबई : अख्ख्या महाराष्ट्रात सध्या सैराटची हवा आहे. बॉक्स ऑफिसवर तर हा सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत अनेक विक्रम करत सैराट होऊन धावतोय. सैराटच्या गाण्यापासून ते त्याच्या डायलॉगपर्यंत सगळीकडे सैराटची चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाण्यांच्या व्हिडीओंना तर पहिल्यापासूनच लोकांनी पसंती दर्शवली होती. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील संवादही आता लोकप्रिय ठरू लागलेत.


आर्ची आणि परश्या यांच्यातील संभाषणामधील त्यांचे डायलॉग प्रत्येकाच्या तोंडी आहेत. सोशल मीडियावरही हे डॉयलॉग जबरदस्त व्हायरल होतायत. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाला लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटातील हे


काही प्रसिद्ध डायलॉग


1. तू परशाला हात तर लावून बघ नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाय...


2. तुज्यासारखं गुटखा खाऊन मरण्यापेक्षा आर्चीच्या प्रेमात मेलेलं बर...


3. मला तर खरंच वाटेना मी इथं आहे, अन तू माज्या संग बोलतीया...त्यात खरं न वाटायला काय झालं...मी खरंच आले...


4. मला तर एक मिनिट पण एका वर्षासारखं वाटायला लागलयं...तुझी शपथ...मला करमत नाही तुज्याशिवाय...


5. आर्ची मला तू लय आवडते...मला पण तू आवडते...मराठीत सांगितलेलं कळत नाही...इंग्लिशमधून सांगू...I LOVE YOU


6. नदीच्या काठी घर असायला पाहिजे...तिथे झुळझुळ वाहणारं पाणी...पुढं अंगणात मोठी बाग...मी कामाला जाईन...मी स्वयंपाक करीन...मी लाकडं तोडून आणीन आणि मी दारात उभी राहून तुझी वाट पाहीन...