पाटलाला तहान लागत नाय का? हे म्हणणारी ती म्हातारी कोण...
सैराट चित्रपटातील तुम्हाला पाटलाल तहान लागत न्हाय का हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवतं असेल. तसेच हा डायलॉग म्हणणारी त्या म्हाताऱ्या बाईंच्याही अभिनयाचेही कौतुक होतेय.
मुंबई : सैराट चित्रपटातील तुम्हाला पाटलाल तहान लागत न्हाय का हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवतं असेल. तसेच हा डायलॉग म्हणणारी त्या म्हाताऱ्या बाईंच्याही अभिनयाचेही कौतुक होतेय.
हा अभिनय करणाऱ्या त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून खुद्द नागराज मंजुळे यांच्या चुलती आहेत. एका टीव्ही चॅनेलवर इंटरव्ह्यूमध्ये दिलेल्या माहितीत त्यांनी दिली. मात्र दुखद बाब म्हणजे चित्रपट झाल्यानंतर त्यांच निधन झालं.
सैराटमध्ये त्या बाईंची भूमिका अवघ्या काही मिनिटांची आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतरही आर्ची, परश्या, सल्या, बाळ्या यांच्यासारखेच ते म्हाताऱ्या बाईचे पात्र लक्षात राहते.