मुंबई :  महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हाऊसफूल्लचे बोर्ड घेणारा 'सैराट'ने एक अनोखा विक्रम केला आहे. पहिल्या आठवड्याच्या मानाने आता दुसऱ्या आठवड्यात सैराटच्या थिएटरची संख्या वाढली आहे. आतपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाच्या थिएटरची संख्या दुसऱ्या आठवड्यात वाढली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 


काय केला रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कथा, गाण्यांनी सर्व मराठी मनाला झिंगाट करणारा सैराट चित्रपट पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात ४०० थिएटरमध्ये झळकला. या चित्रपटाचे एकूण ८५०० शो प्रदर्शित झाले. 


आता सैराटला मिळालेल्या रिस्पॉन्सवरून वितरकांनी सैराटचे शो वाढविले आहे. आता ४६० सिनेमागृहात हा सिनेमा झळकणार असून आठवड्यात त्याचे एकूण १४ हजार शो होणार आहेत. म्हणजे दिवसाला साधारणतः २ हजार शो मध्ये प्रेक्षक झिंगझिंग झिंगाट होणार आहेत. 


महाराष्ट्राबाहेरही 'सैराट'ची धूम 


महाराष्ट्रात सैराट बुंबाट कामगिरी करत असताना आता इतर राज्यातही शो हाऊसफूल जात आहे. कर्नाटकमधील आठ थिएटरमध्ये, दिल्ली, हैदराबाद, गोवा गुजरात, मध्यप्रदेशातील इंदूर, भोपाळमध्ये शो हाऊसफूल आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 


विदर्भ मराठवाड्यातही सैराट जोमात


विदर्भात मराठी चित्रपटांना प्रतिसाद जरा कमीच मिळतो, पण सैराटला या विभागात जबरदस्त प्रतिसादात आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी हा चित्रपट हाउसफूल्लचे बोर्ड झळकवत आहे.


 


सैराटचे 'कल्याण'


कल्याण शहरातील पीव्हीआरमध्ये सकाळी नऊ वाजेपासून शो सुरू असून शेवटचा शो रात्री १२ वाजेपर्यंत हाऊसफूल आहे.