मुंबई : अख्या महाराष्ट्राला सैराट करणाऱ्या सैराट सिनेमाला पायरसीमुळे चांगलाच फटका बसला आहे. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या सिनेमाला प्रेक्षकांचं तुफान प्रतिसाद मिळत आहे. पण सिनेमाची कॉपी लिक झाल्यामुळे नागराज मंजुळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


सिनेमागृह हाऊसफूल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाची कॉपी जरी लिक झाली असली तर प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊनच सैराट होणं पसंद केलं आहे. सैराटला अजूनही सिनेमागृहात हाऊसफूल आहे.


प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद


२९ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या‘सैराट’सिनेमात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाने प्रेक्षकाचं मन जिंकलं आहे. चित्रपटाची मूळ प्रिंट लिक झाल्याने नागराज मंजुळे यांनी वांद्रे येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.