`सैराट`च्या निमित्तानं : नागराज आणि राष्ट्रीय पुरस्कार
आपल्या फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे... नागराजने दिग्दर्शित केलेला फॅन्ड्री प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. फॅन्ड्रीपाठोपाठ नागराजने आता सैराटद्वारे आपण खरे हुकमी डिरेक्टर असल्याचचं जणू दाखवून दिलंय.
मुंबई : आपल्या फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे... नागराजने दिग्दर्शित केलेला फॅन्ड्री प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. फॅन्ड्रीपाठोपाठ नागराजने आता सैराटद्वारे आपण खरे हुकमी डिरेक्टर असल्याचचं जणू दाखवून दिलंय.
नागराज स्पेशल टच
विशेष म्हणजे सिनेमात कोणतीही बडी स्टारकास्ट न घेता ग्रामीण भागातील नवख्या मुलांना घेऊन नागराजने हे यश मिळवलंय.सिनेमातील आपल्या लक्षवेधी अभिनयासाठी नायिका रिंकू राजगुरूला विशेष लक्षवेधी अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आल्यामुळे सिनेमा अजुन जास्त लाईमलाईटमध्ये आला होता.
कहाणी आर्ची - परशाची
आर्ची आणि परश्याची ही एपिक निरागस लव्हस्टोरी रसिकांच्या पचनी पडली असून या दोन्ही नवख्या कलाकारांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. खरं तर खूप दिवसांनी, कदाचित खूप वर्षांनी अशा प्रकारची प्रेम कहाणी आपल्या भेटीला आलीय.
आर्ची आणि परशाची ही लव्ह स्टोरी आहे. आज समाज प्रगती करतोय. जग पुढे चाललंय.. विचारसरणी बदलतेय... अनेक जुन्या रुढी परंपरा मागे टाकुन प्रगतीच्या दिशेनं प्रत्येक जण वाटचाल करतोय.. अशातच गरीब श्रीमंत, जात- पात, धर्मांच्या नावावर आजही भेद भाव करणारी मानसिकता अस्तित्वात आहे, हे वास्तव नाकारता येत नाही..
हॅट्रीक करणार?
आजही भारतात ऑनर किंलीग ही गंभीर समस्या बनत चालली आहे. अनेक नेमका नागराजने याच विषय़ाला हात घातला आहे. त्यामुळे सिनेमाचा शेवट कुठेतरी मनाला चटका लावणारा आहे. त्यामुळेच सैराटने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सैराट बॉक्स ऑफिसवरील अजून सगळे रेकॉर्ड तोडेल असचं चित्र सध्या तरी दिसतय. आता सलग दोन सुपरहिट सिनेमे दिल्याने आता यशाची हॅटट्रिक करण्यासाठी नागराज कोणता सिनेमा निवडतो याचीही सगळ्यांना उत्सुकता आहे.