मुंबई : सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलंय. सैराटची फीव्हर सर्वत्र पाहायला मिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळीकडे सैराटमय वातावरण निर्माण झालंय. हेअरस्टाईल असो वा गाडीची नेमप्लेट सर्वत्र सैराटच सैराट आहे. एका जोडप्याने तर चक्क आपल्या बाळाचे नावचं सैराट ठेवलं.


सध्या सोशल मीडियीवर एक टूव्हीलर व्हायरल होतेय. त्या टूव्हीलरवर सर्वत्र सैराटची चित्रे लावण्यात आली आहेत. आर्ची-परश्यासोबतच त्यांचे मित्र सल्या, बाळ्या यांचे फोटोही गाडीवर लावण्यात आलेत. 


महाराष्ट्रासह भारतात आणि भारताबाहेरच्या प्रेक्षकांना याडं लावणारा सैराट सध्या १०० कोटींच्या क्लबच्या दिशेने घोडदौड करतोय.