मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटला अख्ख्या महाराष्ट्राने वेड लावलय. केवळ महाराष्ट्रातच नाही देशात तसेच देशाबाहेरही सैराटची हवा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटला मिळालेली लोकप्रियता पाहता या चित्रपटाचा तेलुगु आणि गुजराती या दोन भाषांमध्ये रिमेक येणार असल्याचे वृत्त आहे. 


चित्रपट निर्माते गिरीश जोहर यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीये. गुजराती आणि तेलुगु या भाषांमध्ये सैराटचा रिमेक बनवण्याचा प्लान असल्याचे त्यांनी म्हटलेय. दरम्यान, सैराटच्या रिमेकमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री कोण असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


सैराट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. मराठी चित्रपटसृष्टीत ५५ कोटींपेक्षाही अधिक कमाई करणारा सैराट पहिला चित्रपट ठरलाय.