मुंबई : सैराट चित्रपटाला सध्या महाराष्ट्रात अफाट यश मिळतेय. त्यातील कलाकार, अजय-अतुलचे संगीत, दमदार अभिनय, डॉयलॉग्ज यांची तर चर्चा सुरु आहेच. मात्र चित्रपटासाठी निवडलेली ठिकाणेही या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आलीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूरच्या विविध भागांमध्ये तसेच कर्जत, हैदराबाद येथील ठिकाणी झाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे आर्ची आणि परशा जेथे शिकत असतात ते कर्जतमधील दादा पाटील कॉलेज.


याच कॉलेजमध्ये परश्या आणि आर्ची यांच्या प्रेमकथेला सुरुवात होते. त्यामुळे सैराटमध्ये या कॉलेजचे स्थान मोठे आहे. 


याच कॉलेजच्या परिसरात आर्चीचा बुलेटवरील प्रसंग, खोखो खेळतानाचे चित्रण, परशा आणि मंग्या यांच्यातील बाचाबाची, तेथील कट्ट्यावर बसून आर्चीला न्याहाळण्याचा प्रसंग हे सर्व चित्रित करण्यात आलेय. 'सैराट'च्या यशामुळे सध्या या कॉलेजचे नावही चर्चेत आहे.