पहिल्यांदा सैराटची चारही संपूर्ण गाणी यू-ट्यूबवर
सैराट सिनेमाची गाणी ही सैराटच्या कहाणी एवढीच हिट होत आहेत, सैराट सिनेमात एकूण ४ गाणी आहेत.
मुंबई : सैराट सिनेमाची गाणी ही सैराटच्या कहाणी एवढीच हिट होत आहेत, सैराट सिनेमात एकूण ४ गाणी आहेत. यापैकी फक्त दोनच गाणी आतापर्यंत यू-ट्यूबवर संपूर्णपणे रिलीज करण्यात आली होती.
यात 'झिंग झिंग झिंगाट' आणि 'सैराट झालं जी' ही दोन गाणी यू-ट्यूबवर संपूर्ण व्हिडीओने रिलीज करण्यात आली होती.
मात्र नुकतीच दोन गाणीही संपूर्ण व्हिडीओसह रिलीज करण्यात आली आहेत.
यात गायिका श्रेया घोषाल यांच्या 'आताच बया का बावरलं' आणि गायक अजय गोगावले यांच्या आवाजातलं 'याड लागलं' हे संपूर्ण गाणं तुम्हाला यू-ट्यूबवर पाहता येणार आहे.
सैराटची संपूर्ण चारही गाणी व्हिडीओ स्वरूपात
आताच बया का बावरलं
याड लागलं
झिंग झिंग झिंगाट
सैराट झालं जी