मुंबई : सैराट सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करतोय, सैराटचे डबस्मॅश प्रचंड लोकप्रिय होत आहेत, यात मिनल पाटील आणि जतिन पाटील यांनी केलेला डबस्मॅश यू-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय झाला.


(डबस्मॅशचा व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिनल आणि जतिन यांनी 'सर माझं नावं प्रवीण बनसोडे, मला वाचायला आवडतं, खरंच आवडतं आई शपथ सर' असा सैराटचा संवाद असलेला, डबस्मॅश जवळ-जवळ १ लाख लोकांनी पाहिलाय.


मिनल आणि जतिन हे आयटी इंजीनिअर आहेत, मिनल बदलापूरची तर जतिन पुण्याचा आहे, डिसेंबर २०१५ मध्ये त्यांचा विवाह झाला. ही जोडी डबस्मॅशच्या प्लॅटफॉ़र्मवर नंबर एक ठरतेय.


मिनल-जतिन हे खूप सारे डबस्मॅश करतात, पण सैराट सिनेमा त्यांना खूपच आवडला म्हणून त्यांनी डबस्मॅश करून यूट्यूबला अपलोड केले आणि हा डबस्मॅश व्हायरल झाला. मिनल-जतिन हे आणखी काही डबस्मॅश करणार आहेत, त्यासाठी यू-ट्यूबवर त्यांनी चॅनेलही ओपन केलंय.


व्हिडीओ पाहा