मुंबई : देशभरातून पसंतीची पावती मिळवणारा सैराट आता लंडनमध्येही रिलीज होणार आहे. दुबई, अमेरिकेतील प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी आर्ची-परश्याची जोडीची कहाणी आता लंडनच्या नागरिकांना पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराट रिलीज झाल्यापासून नवनवे विक्रमांचे इमले रचतोय. या चित्रपटाने ९० कोटीहून अधिक कमाई करत विक्रमाचा नवा उच्चांक गाठलाय. हा चित्रपट १०० कोटींच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय. 


९ जुलैला हा चित्रपट लंडनमध्ये रिलीज होतोय. लंडनमधील थिएटरमध्ये फार कमी भारतीय चित्रपट प्रदर्शित होत असतात. या यादीत आता सैराटचे नावही सामील झालेय. 


नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. यातील गाणी, संवादांना तर प्रेक्षकांनी जबरदस्त दाद दिली.