COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पहिल्या दोन गाण्यांच्या टीझरने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या सैराट या चित्रपटातील सैराट झालं जी या गाण्याचा टीझर नुकताच लाँच झालाय.


फँड्री या चित्रपटाला भरघोस यश मिळाल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटातील आतापर्यंतच्या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांची मिळत असलेली पसंती पाहता हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडेल असं दिसतयं.


गाण्यांचे टीझर पाहता प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाची कहाणी आहे. नुकताच बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडला. यावेळी लोकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाने भारावून गेल्याची प्रतिक्रिया नागराज मंजुळे यांनी दिली होती.