मुंबई : काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर हायकोर्टने आज सलमान खानची निर्दोष सुटका केली. २ वेगवेगळ्या शिकार प्रकरणी मागील १५ वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात होतं. कोर्टाने दिलेल्या निकालानंतर त्याच्या कुटुंबियांनी आणि फ्रन्सने आनंद व्यक्त केला आहे. पण सलमान खानचे पिता सलीम खान यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


सलीम खान यांनी फक्त ऐवढंच म्हटलं की, 'या प्रकरणात मी मागील १५ वर्षांपासून शांत होतो आणि आजही शांतच राहणार आहे.'