मुंबई : बॉलिवू़डची बातच न्यारी. इथले नियम प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. इथल्या अभिनेत्रींच्या पिढ्या बदलल्या तरी अभिनेते मात्र पिढ्यान पिढ्या तेच राहतात. एकच अभिनेता दशकामागे दशक अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांसोबत काम करतो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर सलमान खानचं घेऊ शकतो. एक काळ होता तो जेव्हा करीश्मा कपूरसोबत काम करत होता... त्यानंतर त्याने करीना सोबत काम केलं... आता तर तो अगदी आलियासोबतही काम करू शकतो. त्याचे हेच काही दुर्मिळ फोटो...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूर


  
  हा फोटो आहे त्यावेळचा जेव्हा सलमान खान करीश्मा कपूरसोबत 'अंदाज अपना अपना' चित्रपट करत होता. त्यावेळी करीना लहान होती आणि सलमानची खूप मोठी फॅन होती. म्हणून ती त्याला भेटायला चित्रपटाच्या सेटवर गेली होती. त्याने तिच्याशी एका लहान फॅनप्रमाणेच गप्पाही मारल्या. त्यावेळी सलमानच्या मनात आपण कधी या चिमुरडीसोबत काम करू असा विचारही आला नसेल. करीना बऱ्याचदा तिच्या आईला किंवा वडिलांना घेऊनच सेटवर जात असे, तेव्हाचाच हा एक फोटो...


आलिया भट




आलिया भट मोठी होताना सलमानसोबत खेळलीय. इतकंच काय तर चिमुरड्या आलियाला सलमानने आपल्या कुशीत घेऊन खेळवलंय. पण, आता मात्र आलिया बी-टाऊनची मेंबर झालीय. त्यामुळे ती यापुढे सलमानसोबत रोमान्स करतानाही दिसली तर आश्चर्य वाटायला नको


सूरज पांचोली आणि अथैय्या शेट्टी




सूरज पांचोली आणि अथैय्या शेट्टी दोघंही सलमानच्या नजरेसमोरच लहानाचे मोठे झाले... आणि विशेष म्हणजे सलमाननेच त्यांना पुढे बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं.