मुंबई: बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान आणि भारतीय क्रिकेट संघाचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहली एका म्यूजिक व्हिडिओमध्ये एकत्र येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेल्जियमच्या सनबर्ग फेस्टिवलच्या 10 व्या एडिशनमधील एरिना टूरमध्ये  दिमित्री वेगास आणि लाइक माइक म्यूजिकच्या व्हिडिओत हे दोघे डीजे स्टारबरोबर दिसणार आहे.


दिमित्री वेगास आणि लाइक माइकने काही वर्षांपूर्वी मुंबईत हा शो केला होता. त्यादरम्यान सलमान खानला हा शो खूप आवडला होता. यासाठी सलमान खानने हा म्यूजिक प्रोजेक्ट करण्यासाठी पंसती दर्शवली आहे. आता विराटसुध्दा या म्यूजिक व्हिडिओ प्रोजेक्टला जोडला गेला आहे.