मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड हा नेहमी सोबत असतो. त्याच्या बरोबरच त्याच्या बॉडीगार्डलाही चांगलीच प्रसिद्ध मिळाली आहे. अनेक वादांमध्ये शेराचं नाव पुढे आलं आहे. गेल्या वीस वर्षांपासून शेरा सलमानचा खास बॉडीगार्ड आहे. सलमान खान शेराला सुरक्षेसाठी किती पैसे देतो याबाबत तुम्हालाही ऐकूण आश्चर्य वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिझनेस ऑफ सिनेमाने दिलेल्या बातमीनुसार सलमान खान शेराला दरमहिन्याला 15 लाख रूपये पगार देतो. शेराची स्वतःची सिक्‍युरिटी कंपनीही आहे.


सलमानच्या गाडीला काही वर्षांपूर्वी रस्त्यात चाहत्यांनी घेरलं तेव्हा गाडी जागची हालणेही कठीण झाले होते. त्यावेळी शेरा गाडीतून उतरला आणि गर्दी हटवली. तब्बल 8 किलोमीटरपर्यंत चालत त्याने गाडीपासून चाहत्यांना लांब ठेवले आणि सलमानच्या गाडीला तेथून बाहेर काढले. शेरा सलमानच्या कुटुंबियांच्या सदस्या सारखा आहे.