मुंबई : रणबीर-ऐश्वर्या यांचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे आणि सध्या सगळीकडे फक्त ऐश्वर्या-रणबीरच्या सिजलिंग केमिस्ट्रीचीच चर्चा आहे. सलमान खानने या सिनेमाच्या टीझरवर एक शॉकिंग प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान त्याचा भाऊ सोहेल खानच्या आगामी फ्रीकी अली सिनेमाच्या प्रमोशनसाठी दुबईत आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तू ए दिल है मुश्किल या सिनेमाचा टीझर पाहिलास का... तर त्यावर सलमानने हसत हसत उत्तर दिलं की, 'काय तुम्ही तो पाहिला ? तुम्ही सांगा कसा आहे ते.' ही सलमानची आधीची प्रतिक्रिया होती.


पण आता सलमानने तो टीझर पाहिला आहे. टीझर पाहिल्यानंतर सलमान बोलून पडला की, 'She is so beautiful'. त्याने ऐश्वर्याचं कौतूक केलं आहे.


'ऐ दिल है मुश्किल' मध्ये ऐश्वर्या आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार आहेत.  ऐश्वर्या आणि रणबीरने या सिनेमामध्ये काही बोल्ड सीन देखील केल्याची चर्चा आहे. ज्यावर बच्चन कुटुंबाने नाराजी देखील दर्शवली होती. अनुष्का शर्मा आणि फवाद खान देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे. दिवाळीदरम्यान हा सिनेमा रिलीज होणार आहे.