मुंबई : अभिनेता सलमान खान महाराष्ट्र महिला आयोगासमोर काल पुन्हा गैरहजर राहीला. ‘सुल्तानचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मला बलात्कार पिडित महिलेसाखं वाटलं’ असं वक्तव्य सलमानने काही दिवसांपूर्वी केलं होतं.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर दोनवेळा सलमान आयोगासमोर गैरहजर राहिला. पहिल्यांदा त्याने आपल्या वकिलाकरवी पत्र पाठवले होते. हे प्रकरण आधीच राष्ट्रीय महिला आयोगाकडे असल्याने दोन ठिकाणी सुनावणी होऊ शकत नाही असे त्याने पत्रात म्हटले होते. गैरहजर राहण्याची सलमानची ही तिसरी वेळ आहे.

यावेळीही सलमाने आयोगाला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्याने काय लिहिले आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. ‘पत्राविषयी आम्ही पूर्ण विचार करून मगच पुढील कारवाई करू’ असे महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगासमोरही सलमान हजर राहिलेला नाही.