मुंबई : बलात्काराबाबतचे वादग्रस्त विधान करुन दबंग खान सलमानने चांगलाच वाद ओढावून घेतलाय. सलमानच्या त्या विधानावर त्याच्यावर चहूबाजूंनी टीका केली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अद्याप सलमानने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. सलमान खान नुकताच मुंबई एअरपोर्टवर दिसला. यावेळी त्याला मिडीयाने त्या विधानावर माफी मागणार का असे विचारले असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. 


मीडिया सतत त्याला हा प्रश्न विचारत होती. मात्र सलमान काही उत्तर न देता थेट तेथून निघून गेला.