मुंबई : सलमान खानने 'जय हो' ची को-स्टार डायसी शहाला एक नवी आलिशान गाडी भेट केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान आणि डायसीमध्ये चांगली मैत्री आहे. यापूर्वी कतरिना कैफ बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. त्यावेळीही सलमानने तिला आलिशान गाडी भेट केली होती. पण प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर कॅटने ती गाडी विकून टाकली. 


बॉलिवूडमध्ये सलमान खान अनेकांसाठी गॉडफादर आहे. पक्की मैत्री आणि दिलदार स्वभावासाठी ओळखला जाणारा सलमान आपल्याबरोबरच्या सहकलाकारांना मदत करताना फायदा-तोटयाचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये सलमानच्या शब्दाला वजन आहे, असं म्हटलं जातं.