संजय दत्तसाठी या बॉलिवूड स्टारने केलं पार्टीचं आयोजन
संजय दत्त आज जेलमधून सूटला आणि त्याला स्वत:ला आज स्वतंत्र्य झाल्यासारखं वाटलं. अवैधपणे घरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.
मुंबई : संजय दत्त आज जेलमधून सूटला आणि त्याला स्वत:ला आज स्वतंत्र्य झाल्यासारखं वाटलं. अवैधपणे घरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.
संजय दत्त आणि सलमान खान यांच्यात खूप चांगले संबंध आहे. सलमान खानचं कुटुंबिय नेहमीच दत्त कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे होतं. संजय दत्त आज शिक्षा भोगून आल्यानंतर त्याच्यासाठी सलमानने पार्टी ठेवली आहे.
दोघांचे कुटुंबिय आणि मोजके काही लोकांसोबत सलमानने सेलेब्रिशन करण्याचे ठरवले आहे. पनवेल येथील फार्म हाऊसवर ही पार्टी केली जाणार आहे. संजय दत्त फॅमिलीसह पनवेलला सलमानच्या फार्म हाऊसवर पोहोचणार आहे.
सलमान खान सुल्तानच्या शूटींगसाठी हरियाणाला जाणार आहे त्यामुळे त्याआधीच त्याने संजय दत्तसोबत वेळ घालवता यावा म्हणून पार्टीचं आयोजन केलंय. सलमानने त्याचे ४ बॉडीगार्डस संजय दत्तच्या सुरक्षेसाठी पाठवले असल्याची देखील चर्चा आहे.