मुंबई : सलमान खाननं बिग बॉसमधली स्पर्धक प्रियांका जग्गाला घराबाहेर काढलं आहे. प्रियांकानं बिग बॉसच्या घरात दुसरे स्पर्धक लोपमुद्रा राऊत आणि मनू पंजाबीच्या आजारी आईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती. या वक्तव्यामुळे सलमान खान भडकला आणि त्यानं प्रियांकाची कानउघाडणी करायला सुरुवात केली. यावेळी प्रियांकानंही सलमानबरोबर वाद घालायला सुरुवात केली, ज्यामुळे सलमानचा पारा आणखी चढला. भडकलेल्या सलमाननं मग प्रियांकाला घर सोडून जायला सांगितलं. प्रियांकानं यासगळ्या प्रकाराबद्दल सलमानची माफीही मागितली पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही.


प्रियांका जग्गा फक्त बिग बॉसच नाही तर कलर्स चॅनलच्या इतर कोणत्याही कार्यक्रमात दिसली तर आपण कलर्सबरोबर काम करणार नसल्याचा इशाराही सलमाननं दिला आहे.