मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भारतीय खेळाडूला सलमान खान एक लाख रुपयांचं बक्षीस देणार आहे. ट्विटरवरून सलमाननं ही घोषणा केली आहे. भारतीय खेळाडूंबद्दल असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून आपण हे बक्षीस देत असल्याचं सलमान म्हणाला आहे.



रिओ ऑलिम्पिकसाठी सलमान खानची भारतीय पथकाचा सदिच्छादूत म्हणून निवड झाली होती. सलमानच्या या निवडीवर टीकाही झाली होती.