सुल्तानचे पहिल्याच दिवशी ६ रेकॉर्ड...
सलमानचा बहुचर्चित सुल्तान हा सिनेमा गेल्या बुधवारी रिलीज झाला. रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सहा रेकॉर्ड केले.
मुंबई : सलमानचा बहुचर्चित सुल्तान हा सिनेमा गेल्या बुधवारी रिलीज झाला. रिलीज झाल्याच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सहा रेकॉर्ड केले.
कोणते आहे ते सहा रेकॉर्ड...
१) हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे. याचवर्षी रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर 'फॅन' या सिनेमाने 19 कोटींची कमाई केली होती. आता 'सुल्तान'ने 'फॅन'ला मागे टाकत सर्वाधिक ओपनिंग असल्याचा मान मिळवला आहे.
२) ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणा-या सिनेमांमध्येसुद्धा या सिनेमाने पहिल्या दिवसाच्या कमाईत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. ईदच्या दिवशी रिलीज होणा-या सिनेमांमध्ये सर्वाधिक कमाईचा मान शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या नावी होता. 'चेन्नई एक्स्प्रेस'ने 33.1 कोटींची कमाई केली होती. मात्र आता 'सुल्तान'ने हा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
३) 'सुल्तान'ने रिलीजपूर्वीच एक रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. या सिनेमाचे रिलीजच्या तीन दिवसाआधीच अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले होते. रिलीजपूर्वीच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून 20 कोटींची कमाई केली होती. हे बुकिंग सलमानच्या 'बजरंगी भाईजान' आणि 'किक' या सिनेमांच्या कमाईपेक्षा अधिक आहे.
४) स्पोर्ट्सवर आधारित सिनेमांविषयी बोलायचे झाल्यास, या यादीत हा सिनेमा सर्वात वरच्या स्थानावर आला आहे. स्पोर्ट्सवर आधारित यापूर्वी आलेल्या 'भाग मिल्खा भाग'ने पहिल्या दिवशी 9 तर 'मेरी कोम'ने 8.4 कोटींची कमाई केली होती.
५) सलमान खानने आपल्याच सिनेमांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. सलमानच्या 'एक था टायगर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवसी 33 कोटी, 'बजरंगी भाईजान'ने 27.25 कोटी, 'किक'ने 26.52 कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे हे तिन्ही सिनेमे ईदच्या दिवशीच रिलीज झाले होते.
६) सलमानचे आत्तापर्यंत दोन सिनेमे बुधवारी रिलीज झाले. एक तर 'सुल्तान' आणि दुसरा म्हणजे 'एक था टायगर'. या कॅटेगरीतसुद्धा सुल्तान वरचढ ठरला आहे. 'एक था टायगर' या सिनेमा पहिल्या दिवशी 33 कोटींची कमाई केली होती.