मुंबई : सुपरस्टार सलमान खान त्याच्या आगामी सिनेमात एका चिनी अभिनेत्रीसह दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील वर्षी ईदच्या दिवशी सलमानचा 'ट्यूबलाइट' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात त्याच्यासोबत चीनी अभिनेत्री झू झू दिसणार आहे.


३२ वर्षीय झू झू ने आपल्या करिअरची सुरूवात एक नर्तिका म्हणून केली होती. बीजिंगमध्ये एक स्थानिक गायन स्पर्धा जिंकून तिने बरंच नावही कमवलं. 'द मॅन विथ द आयर्न फिट' या हॉलिवूडपटातही तिने काम केलं आहे. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीये.


झू झूने आपले भारतातील शूटिंगदरम्यानचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यात ती शूटिंग लोकेशन्सचा आनंद घेताना दिसतेय. मुंबईत राहून झू झू हिंदी शिकतेय.


सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं असून याचं शूटिंग सध्या लडाखमध्ये सुरू आहे.