आमिरचा `दंगल` पाहिल्यानंतर सलमानची प्रतिक्रिया
बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा दंगल हा सिनेमा आज रिलीज झालाय. महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाची कहाणी आहे.
मुंबई : बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा दंगल हा सिनेमा आज रिलीज झालाय. महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाची कहाणी आहे.
आमिरच्या या सिनेमाचे चहूकडून कौतुक होतेय. बॉलीवूडचा दबंग खान सलमानने एका विशिष्ट शैलीत दंगलबद्दल आमिरचे कौतुक केलेय.
'माझ्या कुटुंबाने दंगल सिनेमा पाहिला आणि सुल्तानपेक्षा त्यांना दंगल अधिक आवडला. पर्सनली आमिर लव्ह यू मात्र प्रोफेशनली आय हेट यू' असं सलमानने आमिरबद्दल ट्विटरवर म्हटलयं.