मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे त्याने आपला 'बेसब्री' हा सिनेमा रिलीज करण्यास उशीर केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरने सोनम कपूरच्या आगामी सिनेमा 'नीरजा'च्या स्क्रिनिंगच्या क्षणी म्हणालाय. समलानचे सिनेमा मला नेहमी चांगले वाटतात. त्यामुळे मला 'सुल्तान'बद्दल मला खूप अपेक्षा आहेत. सर्वांप्रमाणे मीही या सिनेमाकडे डोळे लावून आहे. मला वाटतं ही चांगली फिल्म असेल, असे आमिर म्हणालाय.


'सुल्तान'मध्ये सलमानने हरियाणातील एका कुस्तीपटूची भूमिका साकारली आहे. यात अनुष्का शर्माही आहे. तर आमिरही आपल्या आगामी 'दंगल' सिनेमात कुस्तीपटूची भूमिका साकरत आहे.


आमिरने 'दंगल'बाबच्या लूकबात सांगितले आहे. हा लूक ३ इडियट्स नाही. गजनीप्रमाणे मिळता जुळता आहे. मी सहा महिन्यात २५ किलो वजन वाढविले आहे. भारी-भक्कम शरिर कमावलेय. 'सुल्तान' यावर्षी ईदच्यावेळी तर 'दंगल' ख्रिसमसला रिलीज होणार आहे.