मुंबई: 'सैराट' चित्रपटानं सध्या प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. जवळपास प्रत्येक थिएटरमध्ये सैराट हाऊसफूल होत आहे. सोशल मीडियावरही सैराटची जोरदार चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटची कहाणी वाळूशिल्पाच्या माध्यमातून मांडणारा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. वाळूशिल्पकार प्रसाद सोनावणे यांनी सैराटमधील काही निवडक क्षण या वाळूशिल्पात रेखाटले आहेत. 


पाहा सैराटचं व्हायरल वाळूशिल्प