मुंबई : नव्वदच्या दशकात हिट जोडी अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. धक धक गर्ल म्हणून माधुरीची ओळख आहे. तर संजय दत्त मुन्नाभाईने प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुन्नाभाई आणि धक धक गर्ल केमेस्ट्री दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधु विनोद चोप्रा यांच्या 'मार्को भाऊ' या सिनेमाच्या निमित्ताने संजय दत्त आणि माधुरी एकत्र येण्याची शक्यता आहे. विधु विनोद  या चित्रपटाच्या निर्मितीत गुंतल्याचे समजते.  या दोघांना राजी करण्यास विधु विनोदने पुढाकार घेतलाय. विधु विनोद जवळपास दोन वर्षानंतर चित्रपट निर्मिती करतोय. तर ‘मार्को भाऊ’चे दिग्दर्शन विधुची बहिण शैली चोप्रा करणार आहे.


संजय दत्त आणि माधुरी या जोडीने साजन, खलनायक, थानेदार, खतरों के खिलाड़ी, महानता आदी चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची त्या काळात चर्चा होती. मात्र १९९३ मध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्टच्या केसमध्ये संजय दत्तचे नाव आल्यानंतर हे नाते तुटले होते. यानंतर दोघांनी एकदाही एकत्र काम केलेले नाही.