मुंबई : भारतात आजवर अनेक पिढ्यांनी संता बंताच्या विनोदांचा पुरेपूर आस्वाद घेतलाय. आता मात्र ही दोन कॅरॅक्टर्स लोकांचं मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर येतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संता बंता प्रायव्हेट लिमिटेड' नावाचा सिनेमा २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झालाय. अभिनते बोमन इराणी आणि वीर दास या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. तर अभिनेत्री लीसा हेडन आणि नेहा धुपिया यांच्याही चित्रपटांत भूमिका असतील.


मात्र, हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात तर नाही ना अडकणार? अशा शंका वर्तवल्या जात आहेत. काहीच दिवसांपूर्वी संता बंता विनोदांचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. शीख संघटनांनी संता बंता विनोदांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकू नये अशीच आशा निर्माते करत असतील.