मुंबई : टीव्हीवर लवकरच 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेचा दुसरा 'सीझन' सुरू करणार असल्याचे संकेत या मालिकेच्या निर्मात्यांनी दिले आहेत. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' ही मालिका २००४ मध्ये सुरू झालेली. ही मालिका ६९ भागांनंतर २००६ मध्ये संपली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेचा दुसरा सीझन नसेल, असे निर्माते जमनादास मजेठिया यांनी २०१२ मध्ये सांगितले होते, मात्र त्यांनीच  'ट्‌विटर'वर मालिकेतील सर्व कलाकारांचे एकत्रित छायाचित्र प्रदर्शित केले आणि  'फॅन्ससाठी लवरकच चांगली बातमी असेल' असं लिहिलंय.


 या मालिकेतील सर्व कलाकार सतीश शहा यांच्या घरी जमले होते. या प्रसंगाचे छायाचित्र मजेठिया यांनी ट्‌विटरवर फोटो लावले आहेत.देवेन भोजानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत सतीश शहा, रत्ना पाठक, सुमीत राघवन, रुपाली गांगुली, राजेश कुमार हे प्रमुख कलाकार होते. ‘सिच्युएशनल कॉमेडी‘ या प्रकारातील 'साराभाई..'ने स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.