आमिर, रणवीर, सलमानसारख्या `करचुकव्या` कलाकारांना सीबीईसीकडून नोटीस
शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी काही अभिनेत्यांना `सीबीईसी` अर्थात `सेंट्रल ब्युरो ऑफ एक्साईज आणि कस्टम`नं नोटीस बजावलीय.
मुंबई : शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी काही अभिनेत्यांना 'सीबीईसी' अर्थात 'सेंट्रल ब्युरो ऑफ एक्साईज आणि कस्टम'नं नोटीस बजावलीय.
सर्व्हिस टॅक्स चुकवल्याची ही नोटीस आहे. आमिर खान, रणवीर सिंग, सलमान खान, यश राज फिल्म्स यांना सर्विस टॅक्स चुकवल्याची नोटीस पाठवण्यात आलीय. चार वर्षांत या अभिनेत्यांनी सुपरहिट सिनेमे दिले पण सर्विस टॅक्स दिला नाही. बजरंगी भाईजान, सुलतान, पीके, यांसारखे सिनेमे हिट झाले, पण त्याचा सर्विस टॅक्स दिला नाही, असं या नोटीशीत म्हणण्यात आलंय.
आमिर, रणवीर यांसारख्या कलाकारांना दिल्या गेलेल्या मानधनाची माहिती देण्याचे आदेश फिल्म प्रॉडक्शन हाऊसेसना देण्यात आलाय. तसंच बॉलिवूड कलाकारांनाही यशराज फिल्म्स, सलमान खान फिल्म्ससारख्या बॅनर्सकडून मिळालेल्या पेमेंटसची माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेत.