मुंबई : 'सेक्स बॉम्ब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॉडेल - अभिनेत्री सोफिया ह्यात हिला तु्म्ही अनेक अवतारांत पाहिलं असेल पण, तिचा सध्याच्या लूकची मात्र तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल... 


सोफिया हयात सध्या अध्यात्माच्या मार्गावर वळलीय... सध्या ती स्वत:ला 'मदर सोफिया' म्हणवून घेतलेय. तिनं आपल्या कपाळावर 'ओम' असं अक्षरदेखील गोंदवून घेतलंय. तिच्या शरीरावर आणखी असे टॅटू पाहायला मिळतायत. तिनं हा आपला नवीन अवतार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलाय.