मुंबई : शाहरुखचा चिमुकला अबरामची झोपच उडालीय... आणि याला कारणीभूत ठरलाय आमिर खान... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अॅपल'चे सीईओ सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्याच स्वागतासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननं एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आमिर खान, माधुरी दीक्षित यांसासहीत अनेक सेलिब्रिटी उपस्थित झाले होते.



आमिर खानची अबरामला भेट


या पार्टीत सगळ्यात जास्त कुणी एन्जॉय केलं असेल तर तो आहे शाहरुखचा चिमुकला अबराम... कारण या पार्टीदरम्यान आमिर अंकलनं अबरामसाठी काही खेळणी भेट म्हणून आणली होती. 


रागावला शाहरुख


पण, हीच खेळणी शाहरुखला भारी पडलीत. पहाटे ४ वाजता शाहरुखनं ट्विटरवर आमिरवर हा राग काढलाय. 'आमिर खेळण्यांसाठी धन्यवाद... अबराम अजूनही जागा आहे आणि त्यांच्यासोबत खेळतोय' असं शाहरुखनं ट्विट केलंय.