मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर आस्क एसआरके सत्र ठेवलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्याच्या चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने शाहरुखला त्याचा नंबर विचारला तेव्हा शाहरुख म्हणाला, फोन नंबरच कशाला मी माझे आधारकार्ड तुला पाठवून देतो.


दरम्यान, यावेळी चाहत्यांनी शाहरुखला बरेच प्रश्न विचारले. एका चाहत्याने यावेळी शाहरुखला ट्विटरवर कोण उत्तरे देत आहे. तु स्वत: की तुला कोणी मदत करत आहे. यावर शाहरुख म्हणाला, मी  मी सध्या बेरोजगार आहे, म्हणून स्वतःच सर्वांना उत्तरं देत आहे, असं शाहरुखने उत्तर दिलं.