२८ वर्षानंतर अखेर शाहरुखने घेतली पदवी
बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने अखेर २८ वर्षानंतर अखेर पदवीधर झालाय. त्याला डीयू कॉलेजकडून अखेर पदवी मिळालीये. याबाबत ट्विटरवरुन त्याने ही माहिती दिली.
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने अखेर २८ वर्षानंतर अखेर पदवीधर झालाय. त्याला डीयू कॉलेजकडून अखेर पदवी मिळालीये. याबाबत ट्विटरवरुन त्याने ही माहिती दिली.
कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन जुन्या आठवणी ताज्या झाल्याचे शाहरुखने यावेळी सांगितले. १९८८मध्ये त्याने कॉलेज सोडले होते. ट्विरवरुन त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा दिवस माझ्यासाठी विशेष आहे. १९८८मध्ये कॉलेज सोडले होते. त्यानंतर मी कॉलेजमध्ये आलोय. मात्र मी एक गोष्ट मिस करतोय. माझी मुले माझ्यासोबत नाहीयेत. मला त्यांना माझे कॉलेज दाखवायचे होते, असे शाहरुखने ट्विटरवर म्हटलेय.
पदवी घेतल्यानंतर शाहरुखने काही वेळ मनोरंजनाचा कार्यक्रमही सादर केला. मंगळवारीच शाहरुखने आपल्या आगामी फॅन या चित्रपटाचा टीझरही लाँच केलाय. हा चित्रपट येत्या १५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.