मुंबई : अभिनेता शशांक केतकर याचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरनं इन्स्टाग्रामवर शशांकच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. प्रियांका ढवळेशी शशांकचं लवकरच लग्न होणार आहे.


होणार सून मी या घरची या मालिकेत 'श्री'ची भूमिका करून शशांक घराघरामध्ये पोहोचला. याच मालिकेतली अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत शशांकचं लग्न झालं पण थोड्याच दिवसांमध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.