मुंबई : कपिल शर्माच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच नूर सिनेमाची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आली होती. नूरच्या प्रमोशनसाठी तिने या कॉमेडी सेटवर हजेरी लावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सोनाक्षीसह शिबानी दांडेकरही उपस्थित होती. आयपीएलमध्ये निवेदन कऱणाऱ्या शिबानीने शोमध्ये येताच मराठी भाषेवरुन कपिलची दांडी गुल केली. 


शोमध्ये आल्यानंतर शिबानीने आपल्याला हिंदी येत नाही मग शोमध्ये का बोलावलं. असा प्रश्न केला. यावेळी सोनाक्षीने तेच शिकवण्यासाठी तुला बोलावलंय असं सांगितलं. 


यावेळी शिबानीने मला मराठी येत, तुला मराठी येत का? असा प्रश्न कपिलला केला. या प्रश्नाने मात्र कपिलची बोलतीच बंद झाली. मी इंग्लिश बोलते, मराठी बोलते आणि तू हिंदी बोलतोस आता काय करणार. मुंबईत राहून तुला अजून मराठी येत नाही असा खोचक सवाल केला. (व्हिडीओमध्ये ३८व्या मिनिटाला शिबानीची एंट्री होते त्यानंतर हा संवाद रंगतो)