मुंबई : बॉलीवूड अभिनेता शायनी आहुजानं ग्रेट ग्रँड मस्तीच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. शायनीनं एकता कपूर, जितेंद्र कपूर, इंदर कुमार यांना ही नोटीस पाठवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटामध्ये मोलकरणीची भूमिका केलेलीचं नाव शायनी दाखवण्यात आलं आहे. हे नाव वापरून शायनी आहुजाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप शायनीच्या वकिलांनी केला आहे. 


शायनी आहुजावर त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. 2009 मध्ये शायनीच्या मोलकरणीनं शायनीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शायनीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरोधात शायनी मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. ही सुनावणी सुरु असल्यानं शायनी सध्या बाहेर आहे.