मुंबई : कलर्स मराठीवर सुरु झालेल्या 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नृत्यातील MADness ने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. तसेच स्पर्धकांनी नेहेमीच आपल्या प्रेक्षकांना आणि परीक्षकांना आपल्या सुंदर नृत्याद्वारे सरप्राईझ दिले, त्यांच्या नृत्यकौशल्याने त्यांनी महाराष्ट्राला आपलेसे केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 MAD शोमध्ये TOP 6 ची निवड झाली आणि या स्पर्धकांमध्ये विजेतपद मिळवण्याची चढाओढ चांगलीच रंगली. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांनी आपली भरघोस मते देउन त्यांचे प्रेम व्यक्त केले. याच ६ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला मिळाला त्यांचा पहिला म्हणजेच महाराष्ट्राचा अस्सल डान्सर मिळाला. शिवम वानखेडे याने मिळवला 2MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर होण्याचा मान, तर राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारे यांनी अनुक्रमे पटकावले दुसरे आणि तिसरे स्थान.


 2 MAD च्या ग्रँड फिनालेमध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सांवत आणि वैभव तत्ववादीने मोना मोना, टूकुर टूकुर आणि तू चीझ बडी हे मस्त मस्त या गाण्यावर अफलातून नृत्य सादर करत सगळ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे परीक्षक उमेश जाधव यांनी बायगो बायगो आणि संजय जाधव यांनी ये जवानी है दिवानी या गाण्यावर डान्स केला जो प्रेक्षकांना विशेष आवडला. तसेच 2 MAD ची परीक्षक अमृता खानविलकर हिने आपल्या दिलखेचक आणि अप्रतिम नृत्याने ग्रँड फिनालेची रंगत अजूनच वाढवली. धर्मेश सर पुन्हा एकदा 2 MAD च्या मंचावर आले आणि त्यांनी ग्रँड फिनालेमध्ये आवाज वाढवा डीजे, ओ काका


 गाण्यांवर परफॉर्मन्स केला. तसेच, TOP 6 मधील राहुल, पलक, सोनल, प्रतीक्षा, शिवम आणि तुषार यांचा  Finale Act तसेच ग्रँड फिनालेमध्ये केलेल्या नृत्याने परीक्षक आणि प्रेक्षक थक्क झाले. त्यांचे ग्रँड फिनालेमधील डान्स पाहून नक्की महाराष्ट्राचा पहिला अस्सल डान्सर कोण बनेल हे सांगणे कठीणच होते. परंतु TOP 6 स्पर्धकांच्या मनात देखील धाकधूक सुरुच होती, प्रत्येक स्पर्धकाला वाटत होत कि आपण हा खिताब जिंकावा कारण सहाही स्पर्धकांनी तशी मेहेनत घेतली होती.


2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या ग्रँड फिनालेमध्ये सगळ्याच स्पर्धकांना महाराष्ट्रातून असंख्य वोट्स मिळाले. या कार्यक्रमातील विजेत्याला शिवम वानखेडेला तब्बल दोन लाख आणि गोल्डन ट्रॉफी मिळाली. या क्षणी बोलताना शिवम वानखेडे म्हणाला, “2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर जिंकून माझे स्वप्न पूर्ण झाले आहे अस मी म्हणेन. मला माझ शिक्षण पूर्ण करायचं आहे. मला मोठा नृत्यदिग्दर्शक आणि डान्सर होऊन संधी मिळाली तर हृतिक रोशनला डान्स शिकवण्याची इच्छा आहे”. तर राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारेला अनुक्रमे सिल्वर आणि ब्रॉंझ ट्रॉफी तसेच एक लाख रुपये मिळाले.