मुंबई : नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराटवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीक्षकांनी तसेच अनेक बॉलीवूड कलाकारांनीही या सिनेमाचे तोंडभरुन कौतुक केले. प्रत्येकाने हा सिनेमा पाहायलाच हवा असे आवाहनही आमिर खानसह अनेकांनी केले. 


सैराटवर आता लेखिका शोभा डे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ट्विटवर त्यांनी सैराटबाबत ट्विट केले. यावेळी त्यांनी अजय-अतुल यांच्या संगीताचेही तोंडभरुन कौतुक केले. 


तसेच प्रेक्षकांना अक्षरश: थिएटरमध्ये थिरकायला लावणाऱ्या झिंगाट गाण्याचीही त्यांनी स्तुती केली.