सिंगापूर बोर्डाकडून बाहुबली २ ला अॅडल्ट सर्टिफिकेट
एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ या सिनेमाची चर्चा जगभरात सुरु आहे. या सिनेमातील डायलॉग तर अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतात. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने तर अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त केलेत.
मुंबई : एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ या सिनेमाची चर्चा जगभरात सुरु आहे. या सिनेमातील डायलॉग तर अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतात. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने तर अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त केलेत.
तीन आठवड्यांपूर्वी बाहुबली २ प्रदर्शित झालाय. मात्र अद्यापही अनेक थिएटरमध्ये याचे शो हाउसफुल्ल आहेत. मात्र सिंगापूरमध्ये अनेकांना हा सिनेमा पाहता येत नाही. याचे कारण म्हणजे सिंगापुरच्या सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला अॅडल्ट सर्टिफिकेट दिलेय.
बाहुबली-2 ला सिंगापुरमध्ये NC16 हे सर्टिफिकेट देण्यात आलेय. याचा अर्थ १८ वर्षांखालील युवक-युवती हा सिनेमा पाहू शकत नाहीत. सिंगापुरने या सिनेमाला अॅडल्ट सर्टिफिकेट देण्याबाबत भारतीय सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी म्हणाले, आम्ही सिनेमाला यूए सर्टिफिकेट दिलो होतो. यातील कोणताच सीन कापण्यात आला नव्हता.
मात्र सिंगापूर सेन्सॉर बोर्डाला हा सिनेमा हिंसक वाटला. सिंगापूर सेन्सॉर बोर्डाच्या मते युद्धाचे सीन्स, सैनिकाचा गळ्या चिरण्याचा सीन हिंसक सीन्स आहेत.