मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाची गाणी आणि प्रोमो पाहून अख्ख्या महाराष्ट्राला झिंग चढायला सुरूवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकू राजगुरूला डॉक्टर व्हायची इच्छा आहे, तेव्हा ती आता दहावीच्या परीक्षेकडे लक्ष देणार आहे.


रिंकू ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील अकलूजची आहे.


रिंकूचं शालेय शिक्षण सुरू असल्याने तिला, कॉलेज लाईफ माहित नाही, म्हणून नागराजने तिला कॉलेज लाईफची माहिती दिली.


सैराट सिनेमाचा अभिनेता आकाश ठोसर हा सिनेमाचं शुटिंग संपेपर्यंत नागराजच्या घरी राहिला होता.


सिनेमात कुठेही सेट उभारल्यासारखं वाटू नये म्हणून नागराजने गावातच शुटिंग पूर्ण केलं.


सैराटमधील परशा हा गरीब कुटुंबातील दाखवण्यात आला आहे, गरीबाचं घर वाटावं म्हणून नागराजने घराची भितं पाडली होती.


सैराटसाठी नागराजने अनेक शहरात ऑडीशन घेतल्या, पण शांत कमी बोलणारा आकाश ठोसरला त्यांनी परशाच्या भूमिकेसाठी निवडला.


सैराटमधील काम करणारे कलाकार हे नागराजच्या गावाशेजारी आणि काही गावातील आहेत.


सैराट सिनेमातील परशाचा मित्र बाळू हा अपंग आहे, आणि त्याचं नाव तानाजी आहे.