नवी दिल्ली : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा म्हणते की, चित्रपट सृष्टीतही महिलांना कमी लेखणारे अनेक लोकं आहेत. परंतू अशा दबावात ठेवणाऱ्या लोकांना तोंड कसे द्यावे हे त्या महिलांवर अवलंबून असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड स्त्री सक्षमतेला प्राधान्य देते असे पत्रकारांनी सोनाक्षीला विचारले असता, 'मी या गोष्टीविषयी अस्वस्त आहे. बॉलिवूडमध्येही स्त्रीयांना कमी लेखणारे, त्यांच्यावर दबाव आणणारे अनेक लोकं आहेत असे ती म्हणाली.' तसेच हे फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर प्रत्येक क्षेत्रात होत असते असेही ती त्यावेळी म्हणाली.


गेल्या सात वर्षात बॉलिवूडमध्ये काम करत असताना मला नेहमीच स्त्रीयांना पाठिंबा देणाऱ्या, त्यांचा सन्मान करणाऱ्या व्यक्ती भेटल्या, त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे असेही ती म्हणाली. सोनाक्षी सध्या तीचा आगामी चित्रपट ‘नूर’च्या रिलीजची तयारी करत आहे. या चित्रपटात ती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच यूट्यूब कॉमेडियन कनन गिल आणि पूरब कोहलीही प्रमूख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पाकिस्तानी लेखिका सबा इम्तियाज यांच्या 'यू आर किलिंग मी'वर आधारीत आहे. हा चित्रपट २१ एप्रिलला रिलीज होणार आहे.