मुंबई : सैराट चित्रपटाची झिंग जितकी प्रेक्षकांवर चढलीये तितकीच बॉलीवूड आणि मराठीतील कलाकारांवर पाहायला मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड तसेच मराठीतील अनेक कलाकार, दिग्दर्शकांनी नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केलेय.


नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही सैराट पाहिला आणि या चित्रपटाने तिला याडचं लावलं असं सोनालीने ट्विटवर म्हटलंय.


सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसांपासूनच विक्रमांचे इमले रचतोय. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा सैराट हा पहिला चित्रपट ठरलाय. या चित्रपटाने आतापर्यंत ५५ कोटींची कमाई केलीय. इतकी बक्कळ कमाई आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला करता आलेली नाही.