मुंबई : गायक सोनू निगमनं आपलं मुंडन केल्यानंतर मौलवीनं जाहीर केल्याप्रमाणे आपल्या स्टायलिस्टसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली... यावर 'वेस्ट बंगाल मायनॉरिटी युनायटेड काऊन्सिल'चे उपाध्यक्ष सय्यद साह अतेफ अली अल कादरी यांनी सोनूला ठेंगा दाखवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनूनं केवळ आपली एकच अट पूर्ण  केलीय. चप्पलांचा हार घालून फिरवणं तर अजून बाकी आहे, जेव्हापर्यंत सोनू या तीनही गोष्टी पूर्ण करणार नाही... तेव्हापर्यंत 10 लाख रुपये मिळणार नाहीत, असं कादरी यांनी म्हटलंय. 


सोनूच्या 'अजान'वर केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर कादरी यांनी जर एखादी व्यक्ती सोनू निगमचं मुंडन करेल, फाटलेल्या चप्पलांचा हार घालेल आणि त्याला देशभर फिरवेल, त्याला आपण 10 लाख रुपये बक्षीस देऊ, अशी घोषणा केली होती.


यासंबंधात फतवा जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या सोनूनं स्वत:च आपल्या स्टायलिस्टला बोलावून मुंडन केलं... आणि घोषणा केल्याप्रमाणे 10 लाख रुपये देण्याचं ट्विटही केलं. 


सोबतच, आपलं ट्विट कोणत्याही धर्माच्या किंवा अजानच्या विरोधात नव्हतं तर विरोध लाऊडस्पीकरला असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं... शिवाय, हे केवळ मस्जिदमध्ये असणाऱ्या लाऊडस्पीकर बद्दल नव्हतं तर मंदिर आणि गुरुद्वारांसाठीही होतं. आपण सर्वच धर्मांचा आदर करत असल्याचंही सोनूनं स्पष्ट केलं.