मौलवींना सोनू निगमने मुंडन करुन दिले चोख उत्तर
मशिदीमध्ये होणाऱ्या भोंग्याविरोधात ट्विट करणारा गायक सोनू निगम आपल्या विधानावर ठार राहिला. त्यापुढे जात त्यांने मौलवींना चोख उत्तर दिले. त्याने आपले मुंडन करत उत्तर दिले.
मुंबई : मशिदीमध्ये होणाऱ्या भोंग्याविरोधात ट्विट करणारा गायक सोनू निगम आपल्या विधानावर ठार राहिला. त्यापुढे जात त्यांने मौलवींना चोख उत्तर दिले. त्याने आपले मुंडन करत उत्तर दिले.
ट्विटनंतर सोनू निगमवर अनेकांनी टीका केली. त्याचे हे ट्विट धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे मतही मांडण्यात आले होते. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सोनू निगमने पत्रकार परिषदेत या ट्विट प्रकरणी त्याची भूमिका स्पष्ट केली.
प्रत्येकालाच त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगत सोनूने आपल्या भावनांचा आणि ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे म्हटले. सोनू निगमने सर्वांनाच थक्क करत दिल्या शब्दाप्रमाणे मुंडन करत स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहणे पसंत केले आहे.
‘कोणालाही दुखावण्याचा, कोणत्याही धर्माची निंदा करण्याचा माझा हेतू नाही. त्यासोबतच कोणाचाही अनादर करण्यासाठी मी ते ट्विट केले नव्हते. मुळात माझा विरोध मोठ्या आवाजातील लाउडस्पीकरला, असे म्हणत सोनूने उगाचच बाऊ केल्याचे म्हटले. सोनू निगमचे जो कोणी मुंडन करील त्याला १० लाख रुपयांचे बक्षिस देण्याचे एका मौलवीने जाहीर केले होते.